Hit and Run : हिट अँड रनचा आरोपी पंजाबमधून अटकेत

Hit and Run : हिट अँड रनचा आरोपी पंजाबमधून अटकेत

पोलिस हवालदाराला लाच घेतांना रंगेहात पकडले

वसईः १६ एप्रिलला मुंबई-अहमदाबाद हायवेवर पादचार्‍याला धडक देऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रकचालकाला पेल्हार पोलिसांनी तब्बल ६० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पंजाबमधून अटक केली आहे. सुरजित सिंग (५९) असे त्याचे नाव आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिलला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका पादचार्‍याचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेल्हार पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तब्बल ६० हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर हायवेवर पादचार्‍याला धडक दिलेल्या ट्रकचा नंबर हाती लागला.

त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या पथकाने पंजाबमध्ये जाऊन ट्रकचालक सुरजित सिंग याला अटक केली.पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमार गौरव धादवड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

First Published on: April 21, 2024 10:09 PM
Exit mobile version