Bhayander:परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

Bhayander:परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

भाईंदर :- परदेशात नोकरी लावून देतो,असे सांगून फसवणूक होण्याचे प्रकार नवीन नाहीत.असाच प्रकार भाईंदर पूर्वेला उघडकीस आला आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यालय थाटून परदेशात नोकरी लावण्याचे सांगून शेकडो जणांची फसवणूक करणार्‍या तिघांच्या टोळीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून सहा लाख दोन हजार जप्त करण्यात आले आहेत. तक्रारदार पवन सिंग (वय ३८ वर्षे) यांना आरोपींनी इगल प्लेसमेंट सर्व्हीस कंपनीद्वारे परदेशात नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून त्यांचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेतला. आरोर्पीकडे कोणताही नोकरी लावण्याचा परवाना नसताना परदेशात नोकरीस पाठवतो असे सांगुन फिर्यादीकडून एकूण ७९ हजार इतकी रक्कम घेवून फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांच्या तपासाच्या दरम्यान अशाच प्रकारे एकूण १०० ते १५० तरुणांची आरोपींनी फसवणूक करुन रुपये १० लाख २० हजार रुपये एवढया रक्कमेचा तपासात अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड तसेच नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता सूचना केल्या. त्याप्रमाणे नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरपण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटनास्थळाला भेट देवून तांत्रिक विश्लेषण करुन नमूद गुन्हयातील आरोपी अबरार अहमद मुक्तार शहा उर्फ अशपाक (वय-४६ वर्षे) आणि वसिम ऊर्फ साहील यासिन शहा आणि मोहम्मद तारीक ऊर्फ फैजल कादरी अब्दुल गफार सिद्दिकी (सर्व रा. मीरारोड पूर्व मूळ रा.उत्तरप्रदेश )यांना अटक करण्यात आली. सदरची कारवाई ही परिमंडळ- १चे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पालवे व अमोल तळेकर आणि विशाल धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार भूषण पाटील, संतोष पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोलीस शिपाई ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, अस्वर, पवार तसेच मसुबचे कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे.

First Published on: May 3, 2024 7:58 PM
Exit mobile version