Bhayander News: तरूणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल

Bhayander News: तरूणासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल

भाईंदर: मुलानेच घरातील दागिने चोरून मैत्रिणीच्या मदतीने विकल्या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पूर्वेच्या गोल्डन वेस्ट येथील सोनम हाईट्समध्ये वकील असलेले भास्करदत्त देवीप्रसाद उपाध्याय राहतात. त्यांचा मुलगा प्रांजल उपाध्याय हा भाईंदर पूर्वेच्या केबिन क्रॉस रोड येथील पूजा नग मध्ये राहतो. प्रांजल याने वडिलांच्या नकळत व त्यांच्या संमतीशिवाय घरातील सोन्याच्या बांगड्या, चैन ,अंगठ्या, कानातले झुमके-रिंग आदी १ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परस्पर घरातून चोरी केली. नंतर ते त्याने मैत्रीण पूजा तिवारी हिच्या मदतीने विकले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी २१ एप्रिल रोजी मुलगा प्रांजल व मुलाची मैत्रीण पूजा या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत.

First Published on: April 25, 2024 9:46 PM
Exit mobile version