पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी चौकीदार ‘मेटल डिटेक्टर’

पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी चौकीदार ‘मेटल डिटेक्टर’

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयाची सुरक्षा अभेद्य करण्यासाठी अगोदरच सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. मात्र त्याच बरोबर महापालिकेत येणार्‍या नागरिकांची संपूर्ण तपासणी करण्यासाठी प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, तसेच स्कॅनर यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा अजून आणखी चांगली झाली आहे. यामुळे कोणी बॅग किंवा सामानात काही लपवून महापालिकेत घेऊन जाणार असल्यास त्यास बीप-बीप असा आवाज येऊन त्याचा शोध लागणार आहे.

महापालिका अधिकारी तसेच मुख्यालयात येणार्‍या इतर नागरिकांची सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे. महापालिका अधिकारी यांच्याशी काही न काही कारणावरून वाद विवाद होत असतात. तसेच गेल्या वर्षी महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. हल्लेखोरांनी महापालिकेच्या मुख्यालयापासून त्यांच्यावर पाळत ठेवली होती असे तपासात आढळले आहे. त्यामुळे त्यामुळे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा व महापालिकेत येणार्‍या प्रत्येक अधिकारी, नागरिक व कर्मचारी यांना सुरक्षित असले पाहिजे यासाठी सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला होता. त्यामुळे महापालिकेत प्रवेश करणार्‍यांचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक व ज्या अधिकार्‍याला भेटायचे आहे, त्याचे नाव नोंदवहीत नोंदवण्याचे काम महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांकडून दररोज केले जाते. आता त्यात मेटल डिटेक्टर व स्कॅनर यंत्राची भर पडली आहे.

First Published on: May 18, 2023 9:51 PM
Exit mobile version