कोटींचे वीज पाठवणारा लिपिक निलंबित

कोटींचे वीज पाठवणारा लिपिक निलंबित

वसईतील भार गिरणीला 80 कोटी रुपयांचे बिल पाठवून शॉक दिलेल्या लेखा विभागाच्या लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. तर उपविभागीय अधिकार्‍यासह सहाय्यक लेखापालाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रिडींग एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

निर्मळ येथील भात गिरणीचे मालक सतीश नाईक यांना महावितरणकडून 79 कोटी 14 लाख 16 हजार रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले होते. कोटयवधी रुपयांचे वीज बिल पाहून नाईक कुटुंबाला धडकीच भरली होती. कोट्यवधी रुपयांचे वीज बिल सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर महावितरणला खडबडून जाग आली आणि त्यांच्याकडून चुकीची दुरुस्ती करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी वीज बिलात दुरुस्ती करून 86 हजार 890 रुपयांचे बिल पाठवण्यात आले. त्यामुळे नाईक कुटुंबियांना दिलासा मिळाला. भात गिरणीला दरमहा पन्नास ते साठ हजार रुपयांच्या दरम्यानच बिल येत असे. पण, 80 कोटींच्या आकड्याने नाईक कुटुंबाचे धाबे दणाणले होते.

दरम्यान, या प्रकाराची महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. सदर बिल पाठवणार्‍या लेखा विभागातील वरिष्ठ लिपीक दीपेंद्र शिंदे यांना मंगळवारी संध्याकाळी निलंबित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक लेखापालांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. चुकीचे रिडींग घेतल्याप्रकरणी रिडींग एजन्सीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीचे वीज बिल असेल तर त्यात दुरुस्ती केल्याशिवाय ग्राहकांना बिले देऊ नयेत, असे आदेश आता संबंधितांना देण्यात आले आहेत.

First Published on: February 24, 2021 8:11 PM
Exit mobile version