कोरोना पुन्हा घाबरवतोय, रूग्ण संख्या दुप्पट,मृत्यू दर कमी

कोरोना पुन्हा घाबरवतोय, रूग्ण संख्या दुप्पट,मृत्यू दर कमी

पालघर : पालघर जिल्ह्यात मागील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 65 होती. मात्र अवघ्या दोन दिवसात ही संख्या 117 वर पोहचली आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात एक मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 61 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून डहाणू तालुक्यात 16 मोखाडामध्ये एक, तलासरीमध्ये दोन असे एकूण 80 रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आले आहेत. तर, वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रात 37 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण संख्या जिल्ह्यातील 117 झाली आहे.

जिल्ह्यात 15 मार्च 2023 पासून आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये 119 व वसई -विरार महानगरपालिकेमध्ये 74 असे 193 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना बाधिताचा एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना बाधित मृत्यूचा दर 0.8 असून वसई- विरारमध्ये 0.0 आहे. तर एकूण 0.5 मृत्यू दर राहिला आहे. तसेच जिल्ह्यात ग्रामीण भागात 38 तर वसई -विरार महानगरपालिकेमध्ये 48 असे एकूण 86 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात 31.9 टक्के असून वसई -विरारमध्ये 64.9 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण 44.6 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात 15 मार्च ते आतापर्यंत ग्रामीण भागात 80 रुग्ण ऍक्टिव्ह असून वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात 37 रुग्णालय जिल्ह्यात एकूण 117 रुग्ण आजच्या स्थितीत ऍक्टिव्ह आहेत. तसेच 15 मार्चपासून आतापर्यंत ग्रामीण भागात 951 चाचण्या करण्यात आल्या तर वसई -विरार महानगरपालिकेमध्ये 4391 अशा एकूण 5342 चाचण्या करण्यात आल्या आहेत.तर ग्रामीण भागात 13 व वसई- विरार महानगरपालिकेमध्ये दोन एकूण असा एकूण चार पॉझिटिव्ह रुग्णांचा दर आहे.

First Published on: April 11, 2023 9:36 PM
Exit mobile version