Dabhosa Waterfall: बुडून एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

Dabhosa Waterfall: बुडून एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

जव्हार: मीरा- भाईंदर येथील तीन तरूण दाभोसा या धबधब्याच्या ठिकाणी आले होते .इथली भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या खोलीचा अंदाज याबाबत काहीही माहित नसताना डोंगरावरून जिथून धबधबा खाली कोसळतो त्या ठिकाणी दोन तरुण वर चढून गेले व तिसरा तरुण खालून त्यांचा व्हिडिओ चित्रण करण्यासाठी थांबला होता. वर गेलेल्या तरुणांनी 120 फूट उंचीवरून खाली डोहात उडी मारली.त्यात माज शेख नावाचा तरुण पाण्याच्या वर आलाच नाही तर दुसरा तरुण जोयेब शेख हा गंभीर जखमी अवस्थेत कसाबसा किनारावर आला. जखमी तरुणाला जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तर बुडालेल्या तरुणाला शोधण्याचे तपास कार्य सुरू आहे.धबधब्यांची राजधानी म्हणजे जव्हार. पर्यटनाच्या दृष्टीने साधारण ३०० किलोमीटर अंतरापासून पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याकडे आकर्षित होऊन सुट्टीच्या दिवशी सहलीचे नियोजन करीत असतात. परंतु काही अतिउत्साही पर्यटक शिस्त मर्यादा ओलांडून आपला जीव गमावून बसतात. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात उन्हाळी पर्यटना करिता पर्यटक या भागात येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक पर्यटक हे धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालत असतात. भान हरपून पाण्यात उतरून मजा लुटण्याचा प्रयत्न होतो .परंतु हीच मजा सजा होऊन अनेक पर्यटकांचे प्राण गेले आहेत.

First Published on: May 5, 2024 10:59 PM
Exit mobile version