डहाणू पंचायत समितीची धोकादायक इमारत रिकामी करण्याचा निर्णय

डहाणू पंचायत समितीची धोकादायक इमारत रिकामी करण्याचा निर्णय

डहाणू:डहाणू पंचायत समितीची प्रशासकीय इमारत जीर्ण झाल्याने वापरण्यास अयोग्य असून जीवितास धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून इमारत रिकामी करण्याचा पंचायत समिती प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सुटकेचा नि:श्वास टाकला. डहाणू पंचायत समितीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवला होता. परंतु निधीचे कारण देत, पंचायत समितीला स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणाचे सांगितले होते. तसेच वसईतील शासन मान्यता प्राप्त कंपनीकडून जानेवारीच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. त्यासाठी त्यासाठी सेस फंडाचा निधी वापरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरवाड्यात इमारत जीर्ण होऊन ती वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार डहाणू पंचायत समिती प्रशासानाकडून मार्च महिनाच्या पहिल्या आठवड्यात इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१९६५ साली लोडबेअरिंग पद्धतीने बांधलेल्या इमारतीचा तळ व पहिला मजला अशी बांधणी असून छप्पर आरसीसी स्लॅबचे आहे. सामान्य प्रशासन, लेखाविभाग, बांधकाम, पाटबंधारे, एम आरजीअस, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षण आणि ग्रामपंचायत, इंदिरा आवास योजना, इ. विभाग असून गटविकास अधिकारी तसेच सभापती आणि उपसभापती दालने आहेत. इमारत रिकामी करून विविध विभागांचे कामकाज सुरु करण्यासाठी मूळ इमारतीच्या पाठीमागे कर्मचारी निवासस्थानांच्या खोल्या वापरल्या जातील असे सांगितले जाते. इमारत निर्खेलन प्रस्ताव जिल्ह्याला पाठवून त्याला बांधकाम अधिक्षक अभियंतांची परवानगी मिळण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात आले.

First Published on: March 21, 2024 10:13 PM
Exit mobile version