मोखाड्यातील वाशाळा पर्यटनस्थळाच्या विकासाकामाला सुरुवात

मोखाड्यातील वाशाळा पर्यटनस्थळाच्या विकासाकामाला सुरुवात

पर्यटनस्थळाच्या विकासा कामाला सुरुवात

ओसरविरा प्रमाणेच वाशाळा येथे पर्यटन विकासाच्या नावे अजूनपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी असताना हा परिसर सुशोभिकरणापासून उपेक्षित राहिला होता. याविषयी ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रसारित केले होते. त्या वृत्ताची दखल संबधित अधिकाऱ्यांनी घेत त्वरित काम चालू केले आहे. वाशाळा येथे लेणी असलेल्या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये घाट बांधणे, सुशोभिकरण करणे, पदपथ बांधणे, पेवर ब्लॉक बसवणे तसेच शौचालय बांधणे, पाणीपुरवठा, पथदिवे, सौर ऊर्जा, अंतर्गत रस्ते उभारण्यासाठी, गटार, संरक्षण भिंत, भौतिक सुविधा, रेलींग- सभामंडप उभाण्यासाठी प्रयोजन करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात लेणीच्या ठिकाणी आवश्यक सुशोभिकरण किंवा अपेक्षित पायाभूत सुविधांचा स्तर अजूनही उंचवण्यात आला आहे. शौचालय पथदिवे तसेच प्रशासकीय मान्यता नमूद केलेल्या अनेक सोयी-सुविधा प्रत्यक्षात दिसून येताना दिसत आहेत. पर्यटनस्थळ येथील विकासकामांना आता वेग आला आहे. तसेच कामाचा दर्जाही अतिशय चांगली ठेवण्यात आला आहे. वाशाळा गाव हे गाव न राहता आता पर्यटनस्थळ म्हणून प्रकाश झोतात आले आहे. अतिशय चांगली विकासकामे केल्यामुळे वाशाळा परिसरात अतिशय सुंदर आणि मन मोहून टाकणारे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तेथे लोकांची गर्दी वाढत चालली आहे. लोक लेणी बघण्यासाठी दुरून दुरून येतात आणि त्याठिकाणी रममाण होऊन जातात.
वाशाळा येथील गावकरीसुद्धा काम बघून अतिशय भारावून गेले आहेत. आपला वाशाळा पर्यटनस्थळांमध्ये समावेश झाला म्हणून खूप खुश झाले आहेत. काम जवळजवळ ८० टक्के झाले असून थोड्याच दिवसात ते पूर्ण होईल, अशी माहिती संबंधीत ठेकेदाराने ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

(ज्ञानेश्वर पालवे हे मोखाड्याचे वार्ताहर आहेत.)

First Published on: March 14, 2022 9:17 PM
Exit mobile version