गणेशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली

गणेशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली

वाडा : गणेशोत्सवासाठी वाड्यातील फळांची दुकाने सजली असून गणेशभक्तांकडून दुकानांत फळे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. गणपतीच्या आरासेत काही कमी पडू नये म्हणून विशेष काळजी गणेशभक्तांकडून घेतली जाते.त्यामुळे बाजारात आकर्षक व वैविध्यपूर्ण सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर गणपती पुजेसाठी नैवेद्य म्हणून पाच फळे लागतात. याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे फळविक्रेत्यांनी फळांची दुकाने सजवली आहेत. नैवेद्याची पाच फळे घेण्यासाठी गणेशभक्तांकडून फळांच्या दुकानात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. फळांचे दर पुढीलप्रमाणे- सफरचंद 100 रूपये किलो, केळी 40- 50 रूपये डझन, नासपती 100 रूपये किलो, पेरू 60 रूपये किलो, चिकू 60 रूपये किलो, डाळिंब 80 -100 रूपये किलो, कलिंगड 20 रूपये किलो, द्राक्ष 300 रूपये किलो, संत्री 180 रूपये किलो, पपनस 100- 150 रूपये नग, पपई 50 रूपये किलो, ग्रीन अ‍ॅपल 200 किलो, नागफळ 100 रूपये किलो, नारळ 25, किवी 100 रूपये किलो, खायची पाने 1 रूपये नग, सुपारी 10 रूपये नग, केवडा 50 रूपये नग असे फळांचे भाव असून नेहमी प्रमाणेच हे भाव असल्याचे कुडूस येथील फळविक्रेते शिवा मालाकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याशिवाय केवडा व हिरवी गौराई ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून गणेशभक्त खरेदी करताना दिसून येत आहेत.

First Published on: August 30, 2022 9:22 PM
Exit mobile version