हार्दिक सानेची एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत भरारी

हार्दिक सानेची एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत भरारी

स्वप्नावरची निष्ठा आणि निर्भयता ज्याच्याकडे असते तो खरा सिकंदर…! म्हणूनच स्वप्न उराशी बाळगणे सोपे नाही. आपल्या जिद्दीवर, आत्मविश्वासावर अढळ श्रद्धा ठेवून परिस्थितीच्या पलिकडे जात अक्षरश: जगावे लागते. पावलोपावली त्याच्या नजरेला, स्वप्नपूर्तीसाठी अंतर्मनातील संवेदनेला छळणाऱ्या संवेदना पद्धतशीरपणे आणि तितक्याच मोजकेपणाने समोर ठेवून स्वप्नांची खडतर वाट चालावी लागते. अशीच खडतर वाट सर करण्याचे स्वप्न विरारमधील हार्दिक साने याने पाहिले आहे. एव्हरेस्टच्या बेस कॅम्प (अर्थात एव्हरेस्ट शिखराचा पायथा) इथवरचा प्रवास हार्दिक याने केवळ जिद्दीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नात यशस्वी केला आहे. मात्र एव्हरेस्ट शिखर सर करणे हा त्याचा संकल्प आहे.

हार्दिक साने

हार्दिक हा विरार पूर्वेतील शिरवली या ग्रामीण भागात त्याच्या कुटुंबासह राहतो. हार्दिकने महाराष्ट्रातील उंच सुळके, शिखरे आणि किल्ल्यांवर यशस्वी ट्रेकिंग केली आहे. महाराष्ट्रभर फिरताना हार्दिकच्या पावलांनी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास पहिल्या प्रयत्नात करण्याचा निर्धार केला. एव्हरेस्ट हे जगभरातील गिर्यारोहकांना भुलवणारे, त्याच्या प्रेमात पडायला लावणारे शिखर आहे. तो जितका उत्तुंग आहे तितकाच खडतरदेखील. त्यामुळे जगभरातील अगदी मोजकेच गिर्यारोहक त्याच्या वाटेला गेले आहेत. हार्दिकनेदेखील एव्हरेस्ट भरारीचे स्वप्न पाहिले आहे. मात्र एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणारा खर्च अत्यंत महागडा आहे.

पण एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करून हार्दिकने ८ मार्च रोजी एव्हरेस्टच्या दिशेने प्रयाण केले. तब्बल १४ दिवसांचा प्रवास करून तो एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचला. ५ हजार ३६४ मिटरपर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण केला होता. या बेस कॅम्पपर्यंतचा प्रवास करताना हार्दिने एव्हरेस्टच्या दिशेने टाकलेले खडतर पाऊल त्याला पुढे एव्हरेस्ट सर करण्याचे बळ देणार आहे.

हेही वाचा –

उन्हाळी सुट्टी रद्द, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिलमध्येही शाळा पूर्णवेळ सुरु राहणार

First Published on: March 28, 2022 8:37 PM
Exit mobile version