शीर नसलेली तरूणी,हातावर त्रिशूल ,ओम टॅटू

शीर नसलेली तरूणी,हातावर त्रिशूल ,ओम टॅटू

भाईंदर :- वेळ सकाळची. भाईंदरच्या पश्चिमेस असलेल्या उत्तन समुद्रकिनारी स्थानिक नागरिक फिरत होते.त्यावेळी त्यांच्या निदर्शनास एक अज्ञात बॅग आली. त्यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी करून सदर बॅग उघडून पाहिली असता त्यात मुंडक नसलेला आणि फक्त महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. अल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत हा मृतदेह आढळून आला असून मृत महिलेच्या हातावर त्रिशूल आणि ओम नावाचा टॅटू गोंदवलेला आहे. आढळलेला मृतदेह हा २५ ते ३० वयोगटातील महिलेचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महिलेच्या शरीरावर मरून रंगाचा टी-शर्ट असून त्यावर बि-युअर सेल्फ असे नाव लिहलेले आहे. या महिलेचे मुंडक बॅगेत आढळून आलेले नसून सदर महिलेचे फक्त शीर असलेला भागच आढळून आल्याने महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. महिलेचा मृतदेह असलेली ही बॅग नेमकी आली कुठून? ही महिला कोण आहे? ही हत्या कोणी केली? याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचप्रमाणे २५ ते ३० वर्षाची महिला बेपत्ता असल्यास उत्तन सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

First Published on: June 2, 2023 9:49 PM
Exit mobile version