India-Pakistan News: अखेर खलाशी विनोद कोल यांचा मृत्यू देह कुटुंबीयांकडे सोपवला

India-Pakistan News: अखेर खलाशी विनोद कोल यांचा मृत्यू देह कुटुंबीयांकडे सोपवला

डहाणू :डहाणू तालुक्यातील अस्वाली गावच्या खुनवडे, गोरातपाडा येथील विनोद लक्ष्मण कोल (वय ५५) या खलाशाचा मृतदेह बुधवार, १ मे रोजी सकाळी अकराच्या दरम्यान कोल कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. कोल यांचा मृत्यू पाकिस्तानच्या कराची तुरुंगात शिक्षा भोगताना, १७ मार्च रोजी उपचारादरम्यान झाला होता. ही बातमी गेल्या एक महिन्यापासून कोल कुटुंबीयांना कळताच घरात शोकाकुळ पसरली होती. मात्र विनोद यांचा मृत देह कसा आणावा याची चिंता लागली होती . मात्र भारत सरकारच्या व पालघर जिल्हा प्रशासन , डहाणू तहसीलदार यांच्या सहकार्याने अखेर खलाशी विनोद कोल यांचा मृतदेह कुटुंबीयांना मिळाला आहे. वाघा बॉर्डरहून अमृतसर आणि तिथून विमानाने गुजरातच्या अहमदाबादला मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास मृतदेह पोहचला.

अहमदाबाद हून रुग्णवाहिकेने हा मृतदेह डहाणूतील अस्वली खुनवडे येथे आणण्यात आला. अहमदाबाद ते डहाणू रस्त्याने बुधवारी सकाळी १०.३०च्या दरम्यान रुग्णवाहिका महाराष्ट्र-गुजरात सीमेवर पोहचली. त्यानंतर अस्वाली येथील घरी कुटुंबीयांना मृतदेह सोपवला गेला. अंतिम संस्कार विधी करीता डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख उपस्थित होते. विनोद सह असे अनेक भारतीय खलाशी हे पाकिस्तानच्या तुरुंगात कैद भोगत आहेत. अशा अनेक खलाशांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका व्हावी ,अशी त्यांचे कुटुंबिय सरकारला कळकळीची विनंती करीत आहेत . यावर भारत सरकारने विचार करावा व त्यांना न्याय मिळावा अशी मागणी कुटुंबीय करीत आहेत.

First Published on: May 1, 2024 6:01 PM
Exit mobile version