वाड्यात मोकाट कुत्र्यांनी घेतला अनेकांना चावा

वाड्यात मोकाट कुत्र्यांनी घेतला अनेकांना चावा

वाडा : वाडा शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून कुत्र्यांचे घोळके जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यावर वावरत असल्याने रस्त्यावरून रहदारी करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. तर लहान मुलांच्या जीवाला अतिशय धोकादायक बाब झाली आहे. बुधवारी दिवसभरात चार ते पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास मोकाट कुत्रा चावल्याने दीपक धिंडे(वय १३), तक्ष कोली (वय ५) व ध्रुपत प्रजापती (वय ३१) यांना वाडा ग्रामीण रुग्णालय दवा उपचारासाठी दाखल केले होते तर इतरांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असावेत अशी माहिती मिळाली आहे.

हे मोकाट कुत्रे शक्यतो लहान मुलांनावर पटकन हल्ला करत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेऊन अशा कुत्र्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाडा नगर पंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ व कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा यांनी केली आहे.

First Published on: May 18, 2023 9:37 PM
Exit mobile version