Nalasopara News: जेसीबीद्वारे गॅस पाईपलाईन फुटली,आणि अनर्थ घडला

Nalasopara News: जेसीबीद्वारे गॅस पाईपलाईन फुटली,आणि अनर्थ घडला

वसई:  नालासोपारा पूर्वेच्या भागात आचोळे येथे लागलेल्या भीषण आगीत येथील द्वारका हॉटेल भस्मसात झाले. मंगळवारी दुपारी अचानकपणे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले. या आगीत सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय जे हॉटेल व इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या भागात गटारीचे काम सुरू आहे. दरम्यान जेसीबीद्वारे हे काम सुरू होते. यावेळी जेसीबी गुजरात गॅस पाईपच्या संपर्कात आल्यानंतर पाईपलाईन फुटली. हिच दुर्घटना आगीचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींची नावे

1).चंद्र- 46
२).राजा शाह- २७
३).सुंदर शेट्टी- ६२
४).गोपाल यशबंगारा – ७०
५).सुनील जाधव वय-३०
६).शिवा पासवान वय -२१
7.इस्राईल शेख वय-28

First Published on: April 30, 2024 6:11 PM
Exit mobile version