नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग

डहाणूःअदाणी इलेक्ट्रिसिटी, अदाणी फाउंडेशन आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशुंसाठीच्या अद्ययावत अतिदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली.याठिकाणी आधी नवजात बालकांसाठी केवळ उपचार केंद्र होते. या विभागातील बालमृत्यूची संख्या पाहता अशा अतिदक्षता केंद्रांची मागणी नागरिक करत होते. डहाणू परिसरात नवजात बालकांसाठी अतिदक्षता केंद्र नसल्यामुळे तेथे महिन्याला तीन ते चार नवजात शिशु मरण पावत होते. ही परिस्थिती पाहून तेथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी अशा उपक्रमासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनशी संपर्क साधला. डिसेंबर २०२२ मध्ये या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अदाणी फाउंडेशनने तातडीने हालचाल करून या केंद्रासाठी निधी मिळवून दिला आणि केंद्राची उभारणी केली.

अत्याधुनिक एनआयसीयूचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास अधिकारी, सीओओ राजेंद्र नंदी, तहसिलदार अभिजीत देशमुख, जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. रामदास मरड, डॉ. बालाजी हिंगणे, उपपोलीस अधीक्षक अंकिता कणसे यांच्या उपस्थितीत पार पडले. अतिदक्षता विभागात 22 नवजात मुलांसाठी गंभीर काळजी सोय, 2 व्हेंटिलेटर, 2 बबल यंत्र, 3 एलईडी फोटो थेरपी यंत्र आणि स्तनपान करणार्‍या मातांसाठी 9 विश्रांती खाटा उपलब्ध आहेत. पूर्वी नवजात बालकांवरील उपचारांसाठी वापी किंवा मुंबईला जावे लागत होते. त्यात वेळ जाऊन बाळाच्या जीवालाही धोका होत असे.

First Published on: March 21, 2024 6:48 PM
Exit mobile version