कोणतीही दरवाढ नाही किंवा करवाढ नाही

कोणतीही दरवाढ नाही किंवा करवाढ नाही

भाईंदर :- मीरा – भाईंदर महानगरपालिकेचा प्रशासकीय काळातील २०२३ – २४ आर्थिक वर्षाचा पहिला २ हजार १७४ कोटी ५४ लाख १३ हजारांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सादर केला. त्यात मागील वर्षाचे २५ लाख रुपये शिल्लक ठेवून सोमवारी १३ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये १९.४८ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानुसार शहरासाठी पालिका आयुक्त व प्रशासक दिलीप ढोले यांनी कोणतीही दरवाढ किंवा करवाढ न-करता अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पात मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, जीएसटी अनुदान, पाणी पुरवठा, जल नि:सारण, मल नि:सारण, इमारत विकास आकार, रस्ता नुकसान भरपाई, मोकळ्या जागेवरील कर, आरोग्य घन कचरा व्यवस्थापन शुल्क, बाजार फी, जाहिरात फलक, वाहनतळ, अनधिकृत बांधकाम शास्ती, परवाना-फी या माध्यमातून महसूल जमा होणार आहे.

खर्चाची तरतूद

स्थायी व अस्थायी वेतानावरील खर्च – १९७.६३ कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत दैंनदिन सफाई व नालेसफाई यांच्याकरिता – २०१.६० कोटी,घनकचरा व्यवस्थापन – १३१.१० कोटी,रुग्णालये दवाखाने – ३०.८५ कोटी ,विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड निधी – ७५ कोटी,पाणी पुरवठा व जल निसारण व मलनिस्सारण – ४३३.१० कोटी, नगरसेवक निधी – २० कोटी,,विद्युत देयके व विद्युत कामे – ५२.१० कोटी,विकास आराखडा, नगररचना – १०.९० कोटी,पर्यावरण विभाग – १३.५० कोटी, निवडणूक विभाग – १२ कोटी,शिक्षण विभाग – ४८.०३ कोटी,उद्याने विकास खर्च – ५७.६३ कोटी,,परिवहन विभाग अंदाजपत्रक – ८८.३० कोटी,भुयारी गटारे योजना – २५ कोटी, महिला व बालकल्याण विभाग – ६.५८ कोटी,अंध व अपंग योजना – ५.२५ कोटी.

 

उत्पन्नाचा स्त्रोत

जी एसटी अनुदान २८० कोटी, मालमत्ता कर १२३.४२ कोटी, १ टक्का मुद्रांक शुल्क ५५ कोटी, इमारत विकास आकार २०० कोटी, रस्ता नुकसान भरपाई ११० कोटी, मोकळ्या जागेवरील कर ५० कोटी, जाहिरात, होर्डिंग्ज व पे अँड पार्क १४ कोटी, पाणी पुरवठा जल निसारण व मलनिःसारण ४१९.६४ कोटी, बाजार फी ८ कोटी, अनधिकृत बांधकाम शास्ति ४.७५ कोटी, शासन अनुदान २९९.४३ कोटी, कर्ज ४३३, विशेष शिक्षण कर ८ कोटी, भांडवली जमा २७.४६, वृक्षकर ४.१७ कोटी, संकीर्ण २०.८०, परवाना फी ५ कोटी असे विविध उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असणार आहेत.

First Published on: March 13, 2023 9:59 PM
Exit mobile version