केवळ दैव बलवत्तर म्हणून…

केवळ दैव बलवत्तर म्हणून…

भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्टेशन.रात्री प्लॅटफॉर्म क्रं. १ वर १२ वाजून १२ मिनिटांची चर्चगेट – विरार लोकल आली.अचानक लोकलमधून प्रवास करत असलेली एक तरुणी चक्कर येऊन प्लॅटफॉर्मवर खाली पडली होती. तेवढ्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्या तरुणीचा हात धरून ओढत रेल्वे रुळाखाली जात असलेल्या त्या तरूणीला बाहेर काढले.े पोलीस शिपाई एकनाथ माने आणि चव्हाणअशी या पोलिस शिपायांची नावे आहेत. पोलिसांच्या या धाडसाचे कौतुक होत असून कुटुंबियांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत. तरुणीचे नाव प्रिया मोरे असे आहे. पोलीस व रेल्वे प्रशासन नेहमी सांगत असते की दरवाज्यात लटकून प्रवास करू नका, पण त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केले जाते.

सदरील घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज नुसार लोकल रेल्वे स्टेशनवर उभी आहे. यावेळी काही लोक ट्रेनमध्ये चढतात, यानंतर काहीच वेळात लोकल चालू लागते. त्याठिकाणीच शेजारीच दोन पोलिसही उभे आहेत. मात्र, गाडी पुढे चालू लागताच अचानक प्रिया या तरुणीला चक्कर येते आणि ती लोकलमधून खाली कोसळते. यानंतर शेजारी उभा असलेले पोलीस प्रसंगावधान दाखवत लगेचच तिला हात खेचून लोकलपासून दूर करतात व तिचा जीव वाचवतात. त्यांनी वेळीच या तरुणीला वर खेचले नसते तर ट्रेनखाली येऊन कदाचित मोठी दुर्घटना घडली असती असेच दिसत होते. या मुलीचे प्राण वाचले असून तिला काहीही दुखापत झालेली नाही. थोड्या वेळानंतर तिच्या आईवडिलांना या घटनेबद्दल कळवण्यात आले. मुलीला तिचा मोबाईल आणि तिची बॅग मिळवून दिली गेली. यानंतर विरारला जाणार्‍या लोकलमध्ये तिला बसवले. त्या मुलीच्या आई- वडिलांनी पोलिसांमुळेच मुलीचे प्राण वाचले व त्यांचे आभार मानले आहेत.

First Published on: March 10, 2024 5:31 PM
Exit mobile version