पीक कर्ज परतफेडीसाठी उरले आता केवळ तीन दिवस

पीक कर्ज परतफेडीसाठी उरले आता केवळ तीन दिवस

वाडा : खरीप हंगाम सन २०२४- २४ या वर्षात ज्या शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकर्‍यांना ३१ मार्च पर्यंत पीक कर्जाची परतफेड केली तर राष्ट्रीयकृत बँकांच्या धरतीवर सहकारी बँका सहा टक्के तात्पुरते व्याज आकारणी करणार आहे. पण ही रक्कम सध्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरणार असून शेतकर्‍यांकडून बँक हमीपत्र लिहून घेत आहे. व्याजाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर ते पैसे बँकेला वळते करावे लागणार आहेत. त्यासाठी ३१ मार्च पर्यंत कर्जाची परतफेड करण्यावर शेतकर्‍यांचा भर असल्याचे दिसून येते. शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याने पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकर्‍यांनी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये गर्दी केली आहे.आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात २९ मार्चला गुड फायद्याची सार्वजनिक सुट्टी आहे.३० मार्चला शनिवार आणि ३१ मार्चला रविवार येत आहे. ३१ मार्च आधी पीक कर्जाची परतफेड करून डीबीटी द्वारे व्याजाच्या परताव्याचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी पीक कर्जाची परतफेड करीत आहेत. वाडा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुडूस शाखेतील बँकेने वितरित केलेल्या कर्जाची ७० टक्के परतफेड झाली असल्याची माहिती बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

प्रतिक्रिया

पीक कर्ज परतफेडीसाठी मार्च महिन्यातील शेवटचे तीन दिवस महत्वाचे असतात. शेतकरी कामांमुळे किंवा इतर कारणांमुळे पीक कर्ज भरू शकत नाही. पण शेवटच्या तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात पीक कर्ज भरतात. ३० व ३१ मार्चला देखील पीक कर्ज स्वीकारण्यासाठी बँक सुरू राहणार आहेत.
-भावेश पाटील, शाखा व्यवस्थापक कुडूस

First Published on: March 28, 2024 8:23 PM
Exit mobile version