पोषण ट्रॅकरमध्ये पालघर जिल्हा राज्यात दुसरा

पोषण ट्रॅकरमध्ये पालघर जिल्हा राज्यात दुसरा

पालघर: केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ९७ टक्के लाभार्थ्यांची आधार सीडींगची माहिती पोषण ट्रॅकर एप्लीकेशनमध्ये यशस्वीरित्या नोंदविण्यात आली. सदर उल्लेखनीय काम केल्याबद्दल पालघर जिल्ह्याने राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव आय. ए. कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रवीण भावसार व प्रातिनिधिक स्वरूपात सीडीपीओ योगिता दांडगे, अंगणवाडी सेविका शीतल पाटील यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यात डोंगराळ, दुर्गम भाग अधिक प्रमाणात आहे. नेटवर्कची समस्या आहे. तरीसुद्धा महिला व बालविकास विभागाच्या महिला कर्मचार्‍यांनी आधार सिडिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असेच कुपोषण मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र काम करून कुपोषण नष्ट करूयात.
-प्रकाश निकम ,
जिल्हा परिषद अध्यक्ष,

शासनाच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांना त्यांच्या ग्रुप वर नेहमी मार्गदर्शक सूचना देऊन त्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यात प्रवीण भावसार यांचे त्यांना सहकार्य लाभले. मदतीने पालघर जिल्हा हे ध्येय गाठू शकला. पुढच्या वेळी अव्वल येण्याचा नक्की प्रयत्न करू.
-भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,

First Published on: March 30, 2023 10:04 PM
Exit mobile version