आदिवासीं बांधवाच्या दारात योजना जायला हव्यात

आदिवासीं बांधवाच्या दारात योजना जायला हव्यात

मोखाडा : आदिवासींसाठी जवळपास ३५० योजना कार्यरत असून आपल्याला यातील बर्‍याचशा योजनांची माहिती नसते.केवळ दहा बारा योजना सोडल्या तर आपण बाकी योजना घ्यायला कमी पडतो.या योजनांतूनच खर्‍या अर्थाने आदिवासींचा विकास होईल, असे ठाम मत यावेळी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी यावेळी व्यक्त केले. खासदार राजेंद्र गावीत यांनी खासदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

याचवेळी अजंता ग्रो मल्टीस्टेट कॉ.ऑफ सोसायटी लि.यांच्यामार्फत योजना मिळवून देण्यासाठी शिबिराचेही आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी याला उपस्थिती लावली होती.मात्र अचानकपणे खासदार गावीत या कार्यक्रमाला पोहचू न शकल्याने या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसभापती वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खासदारांचा या उपक्रमाचे आम्ही मनापासून स्वागत करतो असे सांग वाघ पुढे म्हणाले की, नागरिकांनी आपले अधिकार समजून घ्यायला हवेत. कारण कोणत्या अर्जाची किती किंमत हे आपल्याला कळायला हवे, अन्यथा आपली लूट होते.

सुशिक्षित मुलांनी आपल्या पालकांना अर्ज लिहून द्यायला हवेत.तसेच शेतकरी नागरिकांनी आपला ग्रामसेवक,तलाठी,कृषी अधिकारी यांच्या सतत संपर्कात राहायला हवे जेणेकरून विविध योजनांचा लाभ मिळेल तसेच एखादा अर्ज करून न थांबता त्याचा पाठपुरावाही केला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पाठीशी आहे,असे वाघ म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी आरोग्य ग्रामपंचायत स्तरावरील अनेक समस्या मांडल्या.यावेळी तहसीलदार मयुर खेंगले, गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, साहाय्यक प्रकल्पाधिकारी विजय मोरे,अजंता ग्रोचे सर्व पदाधिकारी तालुका आरोग्य अधिकारी भाउसाहेब चित्तर, पोलीस निरीक्षक ब्राह्मणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: April 17, 2023 10:18 PM
Exit mobile version