मनोर शहरात भटक्या श्वानांची नागरिकांमध्ये दहशत

मनोर शहरात भटक्या श्वानांची नागरिकांमध्ये दहशत
मनोर शहरात दिवसेंदिवस मोकाट श्वानांची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांपासून ते वाहनचालक जखमी होण्याचे प्रमाण वाढू शकते. शहरात गेल्या पावसाळ्यात तीन महिन्यांत ८७ जणांना श्वानदंश झाला होता. सर्वाधिक श्वानदंश मनोर मधील नागरिकांना झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. दोन वर्षांच्या तुलनेत श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात सुमारे  दोनशेहून अधिक भटके श्वान आहेत. या परिसरातील मनोर बस स्थानक,नवी बस्ती, मच्छी मार्केट,ख्वाजा नगर, पोलीस ठाण्याच्या परिसरात भटक्या श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी दहा वर्षाच्या मुलीवर या कुत्र्यांनी हल्ला केला होता. सुदैवाने तेथील रहिवासी आलम शेख आणि काही नागरिकांनी या श्वानांपासून मुलीची सुटका केली होती.
ग्रामपंचायत यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. वाहनांवरून जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे मागील वर्षी बालकांच्या मागे लागून चावा घेण्याचे प्रकार सातत्याने वडले होते.असेच प्रकार आता देखील न होवो या साठी ग्रामपंचायतीने लागलीच या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे,अशी मागणी  नागरिकांकडून होत आहे.
■प्रतिक्रिया
कमीत कमी वीस ते पंचवीस श्वानांचा कळप एकंदर चालतो. शाळकरी मुले आणि रहिवासी यांमुळे भयभीत आहेत.ग्रामपंचायतीने त्वरित या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. नाही तर हे श्वान नागरिकांना चालणे दुबर करतील.
■आलम शेख
रहिवासी
■प्रतिक्रिया
■श्वान पकडण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुविधा नसल्याने आपण जवळील वसई विरार महानगर पालिका जवळ पत्राद्वारे श्वान पकडणार्या गाडीची मागणी केली आहे. लवकरच या भटक्या श्वानांचा बंदोबस्त होईल.
■नितीन पवार
ग्राम विकास अधिकारी मनोर
First Published on: August 18, 2022 3:18 PM
Exit mobile version