विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

वसई: सासरच्या जाचाला कंठाळून वसईत एका 23 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू आणि नंदेचा नवरा अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पूनम रुपेश पालवे (वय 23),असे आत्महत्या केलेल्या विवाहितेच नाव आहे. पती रुपेश पालवे (वय 36), सासू सुनीता महादेव पालवे ( वय 63), नंदचा नवरा देवानंद नारायण पाटील (वय 56) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.

हे सर्वजण वसई च्या भोयदापाडा येथील राहणारे आहेत. मयत पूनम हिचे माहेर लातूर आहे. वसईच्या भोयदापाड्यात पूनम ची मावशी राहायची.मावशीच्या माध्यमातून तीन लाख हुंडा आणी 10 तोळे सोने देऊन हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे यांच लग्न करून दिले असल्याचे मयत पूनम हिच्या भावाने सांगितले आहे. पूनम आणि रुपेश यांना चार महिन्यांचे आणि 3 वर्षांचा अशी दोन मुले आहेत. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिला शारीरिक, मानसिक छळ होत असल्याने तिने 30 मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली,असा आरोप केला जात आहे.

First Published on: April 6, 2023 8:51 PM
Exit mobile version