कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

वसईः पालघर जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या २८ एप्रिलला मतदान होणार आहे. वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. तर पालघर आणि डहाणू कृषी उत्पन्न समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सध्यातील राज्यातील राजकीय समिकरणे पाहता यावेळच्या निवडणुका रंगतदार होणार अशीच चिन्हे आहेत. बाजार समितीच्या निवडणुक कोण कोणाशी युती, आघाडी करणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मागच्यावेळी वसई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यात विरोधकांना काही जागा दिल्या गेल्या असल्या तरी सत्ता मात्र बहुजन विकास आघाडीने आपल्याच ोहाती ठेवली होती. यावेळी याठिकाणी निवडणूक होणार की, पुन्हा विरोधकांना जोडीला घेऊन बिनविरोधची चाल बहुजन विकास आघाडी खेळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून ५ एप्रिलला अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. २१ एप्रिलला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

First Published on: April 3, 2023 9:36 PM
Exit mobile version