घोडबंदर किल्ल्याच्या बुरूजावर सर्वात उंच भगवा ध्वज,उंची आहे….

घोडबंदर किल्ल्याच्या बुरूजावर सर्वात उंच भगवा ध्वज,उंची आहे….

भाईंदर: घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर   हिंदवी स्वराज्ेयाचे प्रतीक असलेला सगळ्यात मोठा भगवा ध्वज डौलाने फडकला . हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आधी ध्वजपूजन यात्रा काढून , मंत्रोचारात पुरोहितांकडून ध्वजाची पूजा करून या भगव्या ध्वजाची बुरुजावर स्थापना करण्यात आली. २४ तास दिवस रात्र हा ध्वज येथे फडकणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर उभा राहिलेला महाराष्ट्रातील हा पहिला भगवा ध्वज स्थापन करण्याची ही घटना ऐतिहासिक असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. बुरुजावरील या ध्वजाची उंची १०५ फूट उंच  आहे. तर भगवा ध्वज २० फूट उंच व ३० फूट लांब ध्वज आहे. हा ध्वज २४ तास फडकत राहील. विशेष म्हणजे हा ध्वज रात्रीही दिसावा यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. आज रिमोटच्या साहाय्याने १०५ फूट उंच ध्वज स्तंभावरून ध्वज वर गेला आणि आकाशात ध्वज डौलाने फडकला.

आमदार प्रताप सरनाईक , ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , पोलीस आयुक्त मधुकर पांडे , आयुक्त दिलिप ढोले यांच्या शुभहस्ते हा भगवा ध्वज रिमोटचे बटन दाबून ध्वज स्तंभावर आकाशात उंच फडकला. घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून मोकळ्या जागेत गार्डनिंग , किल्ल्यातील हौदात म्युजिकल फाउंटन , लाईट अँड साउंड शो अशी बरीच कामे अजून होणार असून त्या सुशोभीकरणाचे लोकार्पण १ मे रोजीच्या दिवशी होईल . त्याच दिवशी शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येईल , अशी घोषणा सुद्धा आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केली.

First Published on: February 19, 2023 9:59 PM
Exit mobile version