डहाणू समुद्रकिनारी रंगणार तीन दिवसांचा डहाणू फेस्टिवल

डहाणू समुद्रकिनारी रंगणार तीन दिवसांचा डहाणू फेस्टिवल

डहाणू : डहाणू महोत्सवाच्या पहिल्या पर्वाच्या भरघोस यशानंतर महाराष्ट्राच्या डहाणू समुद्र किनारपट्टीवर नयनरम्य दर्शन घडवणार्‍या या दुसर्‍या महोत्सवाचे पर्व आयोजित करण्यात येत आहे. डहाणू महोत्सवाच्या पहिल्या पर्वाला दीड लाख पर्यटकांनी भेट दिली होती .तर दीड कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. या महोत्सवात विविध खरेदी खानपान व अन्य उपक्रमाने मोठा आर्थिक फायदा झाला होता.त्यानंतर आता पुन्हा डहाणू डहाणू समुद्रकिनारी 23 ,24 व 25 फेब्रुवारी या तीन दिवसांत हा वार्षिक महोत्सव होणार आहे. हा महोत्सव महाराष्ट्र शासन, स्थानिक, प्रशासकीय यंत्रणा आणि डहाणू नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

डहाणू हे किनारपट्टीवरील एक शांत शहर असून उत्तर कोकणातील महाराष्ट्र -गुजरात सीमेवर वसले आहे. मुंबई ,नाशिक, सुरत शहरापासून डहाणू अडीच तासांच्या अंतरावर आहे. किनारपट्टी संस्कृती नैसर्गिक सौंदर्य तसेच शहरालगत 17 किलोमीटर लांब समुद्रकिनारा आहे. डहाणू हे चिकूच्या बागा तसेच वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

 

येथील स्थानिक संस्कृती कला, हस्तकला कारागिरांना सहभाग घेता यावा यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रातील वॉटर स्पोर्ट, साहसी एअरपोर्ट वॉटर स्पोर्ट, समुद्रकिनार्‍यावरील घोडदळ यांचा आनंद साहसी पर्यटक घेऊ शकतात. मुंबईमधून वीकेंडसाठी बाहेर पडू इच्छिणार्‍यांमध्ये डहाणू आधीपासूनच लोकप्रिय आहे. आता डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे आम्ही ठरवले आहे.
– वैभव आवारे, कार्यकारी अधिकारी, डहाणू नगर परिषद

या महोत्सवात विविध कलाकृतींच्या वस्तू ,आकाश निरीक्षण, विविध शाकाहारी- मांसाहारी पदार्थांचा आस्वाद, हॉर्स रायडिंग, हेलिकॉप्टर शो वाळू शिल्पे बघायला मिळणार आहेत.
– अभिजीत देशमुख, तहसीलदार, डहाणू

डहाणू महोत्सवासाठी पार्किंगचे व्यवस्थित नियोजन केले असून पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असतील. येणार्‍या पर्यटकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.

– दत्तात्रय किंद्रे , पोलीस निरीक्षक, डहाणू

First Published on: February 20, 2024 9:18 PM
Exit mobile version