रस्त्याच्या कडेला पडलेल्या भगदाडामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता

रस्त्याच्या कडेला पडलेल्या भगदाडामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता

मनोर:  पालघरला जिल्हा मुख्यालय झाल्यापासून मनोर पालघर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.वाघोबा खिंडीतील पावसाच्या पाण्याचा पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी असलेली गटारे तुंबल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.रस्त्यावरून पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाघोबा खिंडीच्या पालघर बाजूकडील चौथ्या वळणावर रस्ता खचला आहे.रस्त्याच्या कडेला तीन ते चार फूट खोल खड्डा पडला आहे. रस्त्यालगत दोन ते तीन फूट उंचीचे गवत वाढलेले असल्यामुळे खचलेला रस्ता दिसून येत नाही. खचलेल्या ठिकाणी असलेला संरक्षक लोखंडी रेलिंग तुटून पडलेली असल्याने रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदाराकडून मनोर पालघर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनोर-पालघर रस्त्यावरील वाघोबा खिंडीतील रस्त्याच्या खचलेल्या धोकादायक भागाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 106 अ ची देखभाल दुरुस्तीचे काम पाहणार्‍या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय वसईमध्ये आहे.अभियंत्यांसोबत संपर्क आणि पत्रव्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनोर स्थित गोदामाची जागा निश्चित करण्यात आली होती.पुढे कार्यवाही झाली नाही,त्यामुळे कार्यालय पालघर तालुक्यात हलविण्यात आलेले नाही.

कोट

मागील आठड्यात आम्ही येऊन आणि मनोर पालघर रस्त्याची पाहणी केली आहे.वाघोबा खिंडीजवळ रस्त्याच्या बाजूस जे भगदाड पडले आहे.त्याचे काम कंत्राटदाराकडून लवकरच काम करून घेण्याचे सांगितले आहे.
– तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

First Published on: November 6, 2022 8:50 PM
Exit mobile version