बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांना अटक

सफाळे: विनापरवाना तसेच निर्दयी व क्रूरपणे बांधून बैलांची वाहतूक करणार्‍या तिघांना सफाळे पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची घटना गुरुवार १८ मे रोजी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे फाटकात घडली आहे.
करण विलास पाटील वय (२१ वर्षे) रा- डोंगरे, सफाळे पश्चिम, प्रवीण यशवंत पाटील (वय ५३ वर्षे) रा- खटाळी आणि परेश प्रभाकर भोईर ( वय ३२ वर्षे) रा – डोंगरे,सफाळे पश्चिम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची हकीगत अशी की, गुरुवारी विनापरवाना बैलांची वाहतूक केली जावू शकते याबाबतची गोपनीय माहिती काही दिवसांपूर्वी सफाळे पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सफाळे बाजारपेठ भागात सापळा रचला होता. त्यानुसार गुरुवार १८ मे रोजी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद पिकअप टेम्पो रेल्वे फाटक परिसरातून जाताना पोलिसांनी अडवला. पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता, दोन बैल जोडी यांना अत्यंत क्रूरपणे पायाला व मानेला घट्ट बांधून कोणत्याही प्रकारे चारा व पाण्याची व्यवस्था न करता तसेच कायदेशीर वाहतुकीचा परवाना नसताना वाहतूक करणार्‍या तीन आरोपींना पोलिसांनी अडविले.

First Published on: May 19, 2023 8:55 PM
Exit mobile version