३४ जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

३४ जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

प्रातिनिधिक फोटो

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरात होळी व धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणार्‍या ३४ जणांवर काशीमीरा वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. तर इतर ट्रिपल सीट, सीटबेल्ट न लावणे हेल्मेट न वापरणे अशा एकूण ५९ जणांवर कारवाई केली आहे.शहरात कोणत्याही धर्माचा सण असेल तेव्हा वाहतूक पोलीस व वाहतूक पोलीस हे स्वतः सण साजरा न करता नागरिकांच्या सुविधेसाठी काम करत असतात. वेळोवेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मीरा- भाईंदरमध्ये होळी व रंग पंचमी निमित्त नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी सात स्थानिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांच्या सहाय्याने ३४ वाहनचालकांवर होळी आणि त्यानंतरच्या रंग-पंचमीच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. मद्यपान करून वाहन चालविण्याच्या ३४ प्रकरणांव्यतिरिक्त, ५९ दुचाकीस्वारांवर ट्रिपल-सीट आणि हेल्मेट न घालणारे व इतर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वर्षी मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी सांगितले आहे.

First Published on: March 27, 2024 10:01 PM
Exit mobile version