पोस्ट आफिसकडून आदिवासी ग्राहकाचा छळ; पैशासाठी तब्बल ३ वर्षांपासून फेऱ्या सुरू

पोस्ट आफिसकडून आदिवासी ग्राहकाचा छळ; पैशासाठी तब्बल ३ वर्षांपासून फेऱ्या सुरू

पालघर येथील अल्याळी गावातील रहिवाशी असलेल्या आदिवासी समाजातील गीता गणेश कोम मागील ३ वर्षांपासून पोस्टात जमा केलेले पैसे परत मिळवण्यासाठी धावपळ करत होत्या. मात्र तिला पोस्टातील कर्मचाऱ्यांकडून दाद मिळत नसल्यामुळे लाईलाजाने त्यांनी पालघर येथील शिवसेना नगरसेवकांना ही बाब कळवली. त्या निमित्ताने बुधवारी पालघर पोस्ट ऑफिसमध्ये शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना स्टाईलमध्ये धमाकुळ घातल्याने पोस्ट मास्टर राजू पाटील यांनी येत्या १५ दिवसांच्या आत पीडितेला तिला हक्काचे पैसे देण्याचे आश्वासन दिले. पालघर येथील अल्याळी गावांत राहणाऱ्या गीता गणेश कोम यांची सासू सविता यशवंत कोम यांनी पोस्टात ७ वर्षांपूर्वी काही रक्कम डिपॉझिट केली होती. गीता यांची सासू सविता यशवंत कोम व नवरा गणेश यशवंत कोम यांच्या मृत्युनंतर तसेच कोविडमुळे लावण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे गीता गणेश कोमची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झाली.

 

त्यातच घराची जबाबदारी त्यांच्यावर असताना सासूने पोस्टात जमा केलेले पैसे व्याजासह एकूण १ लाख २ हजार रुपये परत मिळवण्यासाठी पोस्टात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आज नको उद्या ये, आता वेळ नाही मिळत. आता या महिन्यात कामाचा भरपूर लोड आहे, अशी कारणे ऐकावी लागत होती. सतत ३ वर्षे पोस्ट ऑफिसला फेऱ्या मारूनही त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळाली नाही. पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीला पूर्णपणे कंटाळून गेलेल्या गीता कोम यांच्या मनात आत्मदहन करण्याचे विचारू घोळू लागले. एवढ्यात शेजाऱ्यांनी त्यांना स्थानिक शिवसेना नगरसेवक अमोल पाटील यांना संपर्क करून दाद मागण्याचे सांगितले.

 

मी येथे नवीन आलो आहे. ही केस माझ्यापर्यंत आली नसल्याने मला याबाबत जास्त काही माहिती नाही. तरी या केसवर सखोल चौकशी करून पीडितेला १५ दिवसांच्या आत त्यांचे हक्काचे पैसे मिळून देईल.
– राजू पाटील, पोस्ट मास्टर, पालघर पोस्ट ऑफिस

नंतर त्यांनी स्थानिक नगरसेवक अमोल पाटील यांना संपर्क करून आपली व्यथा मांडली. पीडित गीता कोम यांची व्यथा ऐकून शिवसेना नगरसेवक अमोल पाटील यांनी नगरसेवक सुभाष पाटील, नगरसेविका राधा जीतेंद्र पामाळे, नगरसेवक चंद्रशेखर (बंड्या) वडे व स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख यतीन राऊत यांच्यासोबत त्वरित पालघर पोस्ट ऑफिस गाठले. पीडितेला तिच्या हक्काची रक्कम न देण्याच्या कारणाबाबत पालघर पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्टरला विचारपूस केली. पोस्ट मास्तरांनी मी नवीन आहे, सध्या मला यातलं काही माहीत नाही. मग त्यांनी गीता कोम यांची फाईल मागवून घेतली. फाईल बघितल्यावर त्यांनी पीडितेला व उपस्थित सर्व नगरसेवकांना आश्वाशित केले की, येत्या १५ दिवसांच्या आत पीडितेला तिच्या हक्काचे पैसे पालघर पोस्ट ऑफिस कडून देण्यात येतील.

हेही वाचा –

आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार

First Published on: May 4, 2022 8:39 PM
Exit mobile version