पाणीपुरवठा विभागाच्या निरंकुश कारभारामुळे ५०० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित

पाणीपुरवठा विभागाच्या निरंकुश कारभारामुळे ५०० कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित

जव्हार: जव्हार नगर परिषदेकडून शहरात जय सागर जलाशयाच्या माध्यमातून पाणीपुरवठा नागरिकांना करण्यात येत असतो. यंदा नियमित पाऊस झाला. जलाशय देखील भरून ओसंडून वाहत होते. असे असताना देखील रविवारी सकाळी पाच वाजता होत असलेला पाणीपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता जव्हार नगरपरिषदेकडून खंडित केल्याने शहर परिसरातील ५०० कुटुंबांना सुट्टीच्या दिवशी पाण्याच्या गैरसोयीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
जव्हार शहराच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली खडखड धरण नळ पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे संस्थान काळी जव्हार नरेश यांच्या दृष्टिकोनातून या शहराच्या विकासाकरिता शंभर वर्षांपूर्वी जव्हार नगर परिषदेची स्थापना मुकणे महाराजांनी केली होती. या सगळ्या सुख सोयी असताना नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा देणे अपेक्षित आहे.परंतु नागरिकांच्या तक्रारीनंतरही केवळ दिशाभूल चालू आहे.

यंत्रणा जुनाट स्थितीत

आजही शहराला राजे यशवंतराव मुकणे महाराज यांनी तयार केलेल्या साठ वर्षे जुन्या जय सागर जलाशयावर अवलंबून राहावे लागत आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेली यंत्रणा जुनाट झाली असून या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी योग्य प्रकारे व्यक्तीची अजूनपर्यंत व्यवस्था न करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात आजही पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे केवळ जव्हार नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग याला जबाबदार असल्याचे नागरिक बोलत आहेत.

जय सागर जलाशय परिसरात पंपिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करणार्‍या यंत्रणेत बिघाड झाल्याने शहरातील पाणी साठवण्याची केवळ एकच टाकी भरली असल्याने पाणीपुरवठा होण्यास अडथळा झाला.
विशाल मोरे,अभियंता,बांधकाम विभाग

First Published on: October 2, 2022 7:13 PM
Exit mobile version