Mokhada News: बांधर्‍यांच्या गळतीला कधी लागणार पूर्णविराम?

Mokhada News: बांधर्‍यांच्या गळतीला कधी लागणार पूर्णविराम?

मोखाडा: तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असल्याने मृत पाणी साठा टिकून रहावा यासाठी लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ’ पाणी अडवा पाणी जिरवा ’ ही संकल्पना अंमलात आणली गेली.या योजनेतून लाखो रुपये खर्चून नदीच्या पात्रात मोठं मोठे बंधारे बांधून नदीतून वाहणारे पाणी जागेवर अडवून तेथील शेतकर्‍यांना शेतीच्या सिंचनासाठी तर मुक्या जनावरांना उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळावे यासाठी ही योजना महत्वकांक्षी ठरणारी आहे.परंतु, टक्केवारी पायी तालुक्यातील बहुतांश बंधारे मार्च महिन्यातच कोरडे ठाक पडले आहेत.त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेऐवजी ” बंधारे बांधा नफ्याचे जास्त पैसे कमवा ” ही संकल्पना लघु पाटबंधारे विभागाकडून राबवली जात असल्याचा आरोप होत आहे.

लघु पाटबंधारे विभागाकडून तालुक्यात वर्षाकाठी दहा ते पंधरा बंधारे बांधले जातात. परंतु यातील दोन- चार बंधारे सोडले तर बाकीचे बंधारे मार्च महिना येईपर्यंत कोरडे ठाक पडलेले बघायला मिळतात. कारण बंधारा बांधकाम करताना ठेकेदाराने जास्त नफा कमविण्याच्या हव्यासापायी बंधार्‍याचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केले असून त्यात मोठ मोठ्या दगडी वापरून बंधार्‍याचे बांधकाम कसेबसे पूर्ण केलेले असते. त्यामुळे वर्षभरातच बंधार्‍याला गळती लागते आणि बंधारा ऐन मार्च महिन्यातच कोरडा पडला असल्याचे चित्र दिसते.यामुळे अशा बंधार्‍यांची लघु पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासणी करून संबंधित ठेकेदारासह भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.अन्यथा ही बोगस बांधकाम अशीच सुरू राहतील व बंधार्‍याचा मूळ उद्देश तर सफल होणार नाही, पण शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय मात्र नक्की होईल.

First Published on: April 16, 2024 9:56 PM
Exit mobile version