नवीन शैक्षणिक वर्षाच्या खरेदीची लगबग, विद्यार्थी उत्साहात

नवीन शैक्षणिक वर्षाच्या खरेदीची लगबग, विद्यार्थी उत्साहात

जव्हार: आजच्या या प्रगतिशील युगात शिक्षणाला पर्याय नाही ही बाब आता तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये सुद्धा चांगली रुजली आहे. याकरिता प्रत्येक पालक आपापल्या पाल्याला उत्तम शिक्षण देण्याकरिता झटताना दिसत आहे. हे जरी खरी असले तरी वाढणारी महागाई, शैक्षणिक वस्तूंचे वाढलेले दर या बाबी गरीब पालकाला आर्थिक गणित साधतांना तारांबळ उडत आहे. शालेय साहित्याच्या किमतीत यंदाही सरासरी १० ते १५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. यावर्षीपासून पुस्तकांमध्येच वहीची पाने असतील. त्याचा कितपत परिणाम दिसेल याकडे विक्रेत्यांचे लक्ष आहे. गतवर्षांच्या तुलनेत यंदा वह्यांच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

वह्यांचा उत्पादन खर्च, कागदाची भाववाढ, वाढलेला इंधनदर आदींचा परिणाम व यांच्या दरवाढीवर झाला आहे. पेन, पेन्सिल, कंपास, स्कूल बॅग अशा साहित्याच्या किमतीही वाढ झाली आहे. कंपासपेटी, नोटपॅड, स्लेट पाटी, पेन, स्कूल बॅग, अंकलिपी यांना सध्या मागणी आहे. शाळेत पुस्तके मोफत मिळणार असल्याने उलाढाल अत्यंत मर्यादित आहे. वह्यांचे मात्र नानाविध प्रकार बाजारात आले आहेत. या वर्षीपासून पुस्तकात प्रत्येक धड्यानंतर वहीचे एक पान असेल; पण त्यामुळे वह्यांच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे शिक्षक व विक्रेत्यांनी सांगितले. धड्यासंदर्भातील लिखाणासाठी एकच पान पुरणार नाही. जादा वही ठेवावी लागेल. पुस्तकातील पान कच्च्या लिखाणासाठी आणि स्वतंत्र वही उर्वरित अभ्यासासाठी अशी कसरत होईल.

ब्रॅण्डेड साहित्याला जास्त मागणी आहे. वह्यांच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या असल्या, तरी १० ते ३५ टक्क्यांपर्यंत सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो.
हाजी इम्तियाज,शालेय साहित्य विक्रेता

वहीचे पान पुरेसे नाही. प्रत्येक विषयासाठी वही घ्यावीच लागणार आहे. शिवाय बूट, गणवेश व अन्य साहित्याचा खर्च आहेच. शाळेतून आतापासूनच पॅकेजचे पैसे भरण्यासाठी फोन येत आहेत.
मकसूद अत्तार,पालक

वह्यांचे दर प्रती डझन

वहीचे दर. पाने. सन २०२० सन २०२३
जंबो. २००. १८० ते १९०. २०० पासून पुढे
A5. २००. ३०० रुपये. ३०० पासून पुढे
A4. १४०. २६० रुपये. ४०० पासून पुढे
A4. १७२. ३३० ते ३५०. ४५० पासून पुढे

अन्य शैक्षणिक वस्तूंचे दर
ब्रँडेड स्कूल बॅग ६०० रुपये
कंपास पेटी ९० ते ३६० रुपये
बूट ६०० ते ८५० रुपये
गणवेश ५०० ते ९०० रुपये

First Published on: June 9, 2023 10:03 PM
Exit mobile version