Photo : चीनच्या सीमेवर भारतीय लष्कराने डागले अँटी-टँक गाइडेड मिसाइल

Photo : चीनच्या सीमेवर भारतीय लष्कराने डागले अँटी-टँक गाइडेड मिसाइल

गुवाहाटी : लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने गुरुवारी प्रशिक्षणादरम्यान सिक्कीममध्ये 17,000 फूट उंचीवर अँटी-टँक गाइडेड मिसाइल (ATGM) डागले. चीनच्या सीमेजवळ हे मिसाइल डागण्यात आले. पूर्व कमांडच्या मिसाइल-फायरिंगच्या तुकड्यांनी या प्रशिक्षण सरावात सहभाग घेतला होता.

रणभूमीवर निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या अनुषंगाने या सरावादरम्यान विविध प्लॅटफॉर्मवरून हलत्या आणि स्थिर लक्ष्यांवर थेट फायरिंग करण्यात आले, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.

या सरावाला लष्कराने ‘वन मिसाइल वन टँक’ असे नाव दिले होते. कॉन्कर्स एम अँटी-टँक क्षेपणास्त्र बीडीएल कंपनीने परवान्याअंतर्गत देशात तयार केले आहे. त्या संबंधीचा करार रशियाशी झाला आहे.

हे मॅन पोर्टेबल अँटी-टँक क्षेपणास्त्र आहे. ते कोणत्याही टँक किंवा चिलखती वाहनाला उडवू शकते. हे एक्सप्लोझिव्ह रिॲक्टिव्ह आर्मर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामध्ये कोणतीही मजबूत टँक सेकंदात नष्ट करण्याची क्षमता आहे.

ATGM प्रणालीची अचूकता आणि परिणामकारकता उंच भूभागात तपासण्यात आली. याचा व्हिडीओ देखील संरक्षण मंत्रालयाने शेअर केला आहे.

First Published on: April 12, 2024 1:18 PM
Exit mobile version