पारंपारिक वेश, नथीचा साज; कलाकारांकडून गुढीपाडव्या अनोख्या शुभेच्छा

पारंपारिक वेश, नथीचा साज; कलाकारांकडून गुढीपाडव्या अनोख्या शुभेच्छा

पारंपारिक वेश, नथीचा साज; कलाकारांकडून गुढीपाडव्या अनोख्या शुभेच्छा

गुढीपाडवा हा हिंदू नवर्षाचा पहिला दिवस. भारतीय चालीरितीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. आज अगदी सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सारेच हा सण मोठ्या उत्साहाने साजर करतात. मराठी कलाकार तर आवर्जुन दरवर्षी गुढी उभारत या दिवसाचा आनंद घेत असतात. नेहमीच ग्लॅमरस, मॉर्डन पेहरावात असणारे अनेक सेलिब्रिटी गुढीपाडवा या मराठमोळ्या सणाच्या निमित्तानं पारंपरिक साजशृंगारात दिसतात. आजही गुढीपाडव्यानिमित्त अनेक मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मराठमोळ्या पेहराव आणि साज श्रृंगारातील फोटो पोस्टच केले आहे.

First Published on: April 2, 2022 12:49 PM
Exit mobile version