PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका

PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका

नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डू प्लेसिस यांना वेगवेगळ्या आरोपांमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल 2024मध्ये रविवारी दोन सामने खेळले गेले. पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. यानंतर संध्याकाळी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला.

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचां दंड ठोठावण्यात आला आहे.

आरसीबीने केकेआर विरुद्धच्या डावातील 20 षटके वेळेवर पूर्ण केली नाहीत, म्हणून प्लेसिसवर कारवाई करण्यात आली.

पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन याला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

सॅम करन हा आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्यासाठी दोषी आढळला.

First Published on: April 22, 2024 4:51 PM
Exit mobile version