Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम

Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम

लखनऊ : आयपीएल 2024 च्या 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनी आपल्या जुन्या शैलीत दिसला आणि त्याने शेवटच्या क्षणी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर सीएसके 20 षटकांत 6 विकेट गमावत 177 धावांचे आव्हान लखनऊ सुपर जायंट्ससमोर ठेवले. रवींद्र जडेजानेही या सामन्यात सीएसकेसाठी चांगली फलंदाजी करत नाबाद 57 धावा केल्या.

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात एमएस धोनीने 311.11च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि आपल्या खेळीने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला.

एकूण 9 चेंडूंचा सामना करत धोनीने लखनऊविरुद्ध 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या आणि वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

एवढेच नव्हे तर, वयाच्या चाळीशीनंतर 500 धावा पूर्ण करणार पहिला फलंदाज म्हणून नोंद धोनीच्य नावावर झाली.

धोनीच्या आधी, वयाच्या चाळीशीनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा ख्रिस गेल होता त्याने एकूण 481 धावा केल्या होत्या.

ख्रिस गेल याच्यापाठोपाठ राहुल द्रविड (471 धावा) आणि ॲडम गिलख्रिस्ट (466 धावा) यांचा क्रमांक लागतो.


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 20, 2024 9:33 AM
Exit mobile version