PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू

PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू

मुंबई : येत्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कपसाठी होत असून भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. तर, उप-कर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात आले आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे या वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्मा हा आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू ठरला आहे.

2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा आतापर्यंत खेळलेल्या सर्व आठ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होता आणि आता तो जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्येही खेळणार आहे.

 

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2007मध्ये सुरुवात झाली. पहिल्या स्पर्धेत भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी रोहित शर्मा या संघात होता.

 

रोहित शर्मा 2009मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय संघात होता. त्यानंतर 2010मध्ये तिसऱ्या, 2012मध्ये चौथ्या, 2014मध्ये पाचव्या, 2016मध्ये सहाव्या, 2021मध्ये सातव्या आणि 2022मध्ये आठव्या स्पर्धेतही तो खेळला.

रोहित शर्मा जूनपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून 2022मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही तो भारतीय संघाचा कर्णधार होता.


Edited by Manoj S. Joshi

First Published on: May 2, 2024 11:03 AM
Exit mobile version