Photo : राहुल गांधींची मणि भवनला भेट, महात्मा गांधींचा चरखा, चष्मा पाहिला

Photo : राहुल गांधींची मणि भवनला भेट, महात्मा गांधींचा चरखा, चष्मा पाहिला

राहुल गांधींची मणि भवनला भेट, महात्मा गांधींचा चरखा, चष्मा पाहिला

मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधींचे निवासस्थान मणि भवनला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा चरथा, चष्मा व मणि भवनमध्ये असलेल्या विविध गोष्टींची माहिती जाणून घेतली. यानंतर मणि भवन येथून ‘न्याय संकल्प पदयात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेही काँग्रेस समर्थकांसह पायी मोर्चात सहभागी झाले होते. मणि भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही पदयात्रा काढण्यात आली होती.

First Published on: March 17, 2024 4:12 PM
Exit mobile version