रश्मी ठाकरेंनी घेतले टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन

रश्मी ठाकरेंनी घेतले टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सण समारंभ साजरे उत्साहात साजरे केले जात नव्हते. मात्र यंदा राज्यासह संपूर्ण देशभरात सर्व सण आनंदात आणि जल्लोषात साजरे केले जात आहेत. महिनाभरापूर्वी राज्यात गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान, आता सगळीकडे शारदीय नवरात्री साजरी केली जात आहे. याचं निमित्ताने सामान्य जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वचजण प्रसिद्ध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत आहे. नुकत्याच काही वेळा पूर्वी ठाण्यातील स्व. आनंद दिघे यांच्या टेंभीनाक्यावरील देवीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भेट दिली होती.

First Published on: September 29, 2022 6:31 PM
Exit mobile version