Photo: रंगकर्मींचे राज्यव्यापी आंदोलन, आंदोलक रंगकर्मी पोलिसांच्या ताब्यात

Photo: रंगकर्मींचे राज्यव्यापी आंदोलन, आंदोलक रंगकर्मी पोलिसांच्या ताब्यात

Photo: रंगकर्मींचे ज्यव्यापी आंदोलन, आंदोलक रंगकर्मी पोलिसांच्या ताब्यात

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन विश्व गेले दिडवर्षे ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादर येथील स्व. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी हे आंदोलन केले गेले. ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या यावेळी मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना यावेळी भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत भोईवाडा पोलिस स्टेशन बाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला आहे.

 

First Published on: August 9, 2021 5:05 PM
Exit mobile version