Photo : ‘जलसा’च्या प्रमोशन दरम्यान विद्या बालन आणि शेफाली शाहचा गॉर्जिअस लूक

Photo : ‘जलसा’च्या प्रमोशन दरम्यान विद्या बालन आणि शेफाली शाहचा गॉर्जिअस लूक

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शाह स्टारर ‘जलसा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहेत. सिनेमात विद्या बालन पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर अभिनेत्री शेफाली शाह ही एका घरकाम करणाऱ्या बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. एक पत्रकार आणि तिच्या घरात काम करणारी स्वयंपाकीण बाई यांच्या जीवनातील संघर्षाची कथा सांगणारा जलसा हा सिनेमा 18 मार्च रोजी रिलीज होणार आहे. Amazon Prime वर सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या विद्या बालन आणि शेफाली शाह यांचा गॉर्जिअस लूकमध्ये समोर आल्या आहेत. प्रमोशन दरम्यान विद्या आणि शेफाली यांनी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलेय. जलसा सिनेमा रिलीज होण्याआधी शेफाली आणि विद्याचे हे फोटो नक्की पाहा. ( फोटो – सोशल मीडियावरुन साभार )

 

First Published on: March 14, 2022 7:12 PM
Exit mobile version