गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा, मोदी आज चार ठिकाणी घेणार सभा

गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा, मोदी आज चार ठिकाणी घेणार सभा

अहमदाबाद – गुजरातमध्ये पुढच्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर पक्षांच्या प्रचारसभांना जोर आला आहे. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. तर, काँग्रेसननेही मोठ्या नेत्यांसह प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दोन महिन्यांपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मॅरेथॉन प्रचाराला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चार मोठ्या सभा घेणार आहेत. या सभेत ते विरोधकांवर हल्लाबोल करतील. पालनपूर, मोडासा, दहेगाम आणि बावला येथे या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता पालनपूरमध्ये प्रचार रॅली काढतील. त्यानंतर १ वाजता दहेगाममध्ये सभा घेतील. त्यानंतर ते पालनपूर आणि बावला येथे जाऊन प्रचार करतील.

दाहोद आणि मेहसानामध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाल. आदल्या दिवशी दाहोद आणि मेहसाणामध्ये रॅली काढून पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आदिवासी समाजातील एका महिलेला उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने तिला विरोध केला, आता राहुल आदिवासी समाजाला भेटून राहुल यांना काय दाखवायचे आहे.

First Published on: November 24, 2022 10:01 AM
Exit mobile version