देवगड हापूसनंतर आफ्रिकन मलावी हापूस एपीएमसीत दाखल

 देवगड हापूसनंतर आफ्रिकन मलावी हापूस एपीएमसीत दाखल

 

नवी मुंबई: कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देशभर ओळख आहे. एपीएमसीतील फळ बाजारात शुक्रवारी देवगडच्या हापूसची पहिली पेटी दाखल झाली. त्यानंतर शनिवारी परदेशी आफ्रिकन मलावी हापूस दाखल देखील दाखल झाला आहे. त्यामुळे  खवय्यांना  आतापासूनच हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.
मलावी आब्यांला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावीच्या आंब्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून मलावी आंब्याची आवक होत आहे. परदेशातील आफ्रिकन मलावी हापूसच्या  ८०० पेटताआज शनिवारी बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे दाखल झाल्या आहे. सध्या या आंब्याला किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे. तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे.एका बॉक्समध्ये ९ ते १६ नग असतात.पुढील आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी १ हजार बॉक्स दाखल होतील, अशी माहिती पानसरे यांनी दिली.
देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सीताराम शिंदे यांनी या हंगामातील पहिले उत्पादन घेतले आहे. दोन डझनाची पहिली पेटी एपीएमसी बाजारातील व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे दाखल झाली. या  आंब्याची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून या हापूसला  ९ हजार रुपये दर मिळाला आहे. देवगड येथील या शिंदे कुटूंबियांच्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टपासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र ऊन पावसाच्या तडाख्यात काही कलमांवरील मोहर गळून पडला. त्यापैकी चार ते पाच कलमांवरील मोहर टिकवण्यासाठी मेहनत घेऊन हापूसचे पाहिले उत्पादन घेतले आहे.

राज्यातील आंब्याला  परतीच्या पावसाचा फटका
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात झालेला बदल आणि परतीच्या पावसाने घातलेले थैमान याचा फटका आंब्याला देखील बसला आहे. दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याचीआवक सुरु होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. मात्र यंदा पावसाने आंबा पीक धोक्यात आल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

First Published on: November 26, 2022 5:12 PM
Exit mobile version