अहो आश्चर्य, कळंबोलीतील हवा आता सर्वात शुद्ध; यंत्रणाच सदोष ?

अहो आश्चर्य, कळंबोलीतील हवा आता सर्वात शुद्ध; यंत्रणाच सदोष ?

दीपक घरत: पनवेल
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कळंबोली वसाहतीत हेवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. काहीच आठवड्यापूर्वी कळंबोली वसाहती मधील हवेची गुणवंत्ता सर्वात खराब असल्याची आकडेवारी या यंत्रणेद्वारे नोंदवण्यात आली आहे. आता मात्र अचानक कळंबोली वसाहतीमधील हवेची गुणवत्ता सर्वात चांगली असल्याची आकडेवारी यंत्रणा दर्शवत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या प्रयत्नामुळे हा चमत्कार झाला, की एमपीसीबीची ही यंत्रणाच सदोष असल्याने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा दर्शवली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
पनवेल पालिका हद्दीतील जवळपास सर्वच प्रभागात प्रदूषणाचा मुद्दा गंभीर आहे. प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने नागरिकांची प्रदूषणातून मुक्तता करण्यात या साठी एमपीसीबीने प्रयत्न करावेत अशी मागणी सातत्याने खेली जात होती नागरिकांकडून केल्या जाणार्‍या मागणीची दखल घेत एम पी सी बी ने कळंबोली वसाहतीत हेवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा बसवली आहे.

निर्देशांक ६० च्या आत
जवळपास ५० लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या या यंत्रणेद्वारे हवेतून होणार्‍या प्रदूषणावर लक्ष ठेवले जात असून, हवेत कोणत्या प्रकारच्या प्रदूषणाचे घटक जास्त प्रमाणात आहेत याची नोंद केली जाते. जेणे करून हे प्रदूषण कोणत्या कारखान्यातून होते याचा शोध घेणे शक्य होते. कळंबोली वसाहतीत बसवण्यात आलेल्या या यंत्रनेत काही दिवसा पूर्वी हवेच्या गुणवंत्ते निर्देशांक सर्वात खराब म्हणजेच ३५३ इतका असल्याचे दर्शवण्यात आले होते. आता हा निर्देशांक ६० च्या आत म्हणजे सर्वात चांगले असल्याचे दर्शवले जात आहे.

First Published on: January 13, 2023 8:25 PM
Exit mobile version