नांदगाव समुद्रकिनार्‍यावरील बैलगाडी शर्यती आयोजकांवर गुन्हा

नांदगाव समुद्रकिनार्‍यावरील बैलगाडी शर्यती आयोजकांवर गुन्हा

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्र किनारी बुधवारी बैलगाडी स्पर्धा भरवून बैल उधळल्याने तीन प्रेक्षक गंभीर जखमी होण्याच्या दुर्घटनेमुळे शर्यत आयोजकांवर अखेर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडी शर्यतींना काही अटी व शर्तीवर सुरु करण्यास परवानगी मिळाल्याने स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन पांदगाव समुद्र किनारी या शर्यती आयोजीत करण्यात आल्या होत्या. त्यातील एक स्पर्धक बैलगाडी शर्यती पाहण्यास जमलेल्या प्रेक्षकांत घुसल्याने तीन लोक जखमी झाले होते. याचे मोबाईल चित्रीकरण झाले होते व सदरची बातमी इलेकट्रॉनिक्स माध्यमात प्रसिद्ध झाल्याने मुरुड पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुरूड तालुक्यातील वावे येथील बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष व भाजपचे कार्यकर्त शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी तालुक्यातील नांदगाव समुद्र किनारी सायंकाळी बैल गाडी शर्यतीचे आयोजन प्रशासनाची परवानगी न घेता केली होती. स्पर्धा पहाण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक जमले होते. शर्यतीला सुरुवात होताच शर्यतीमधील एका बैलगाडीचे बैल प्रेक्षकांच्या गोंधळामुळे बिथरले आणि ते थेट प्रेक्षकांमध्ये घुसले. यामध्ये तीन लोक जखमी झाल्याने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी सांगितले की, शैलेश काते याना अद्यापर्यंत अटक अथवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. त्यांच्यासह इतरांवरही गुन्हे दाखल होणार आहेत.

First Published on: February 4, 2022 10:00 PM
Exit mobile version