अलिबागला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे सुरक्षा कवच

अलिबागला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे सुरक्षा कवच

अलिबाग-: अलिबागला लाभलेली निसर्ग संपदा पाहण्यासाठी लाखों पर्यटक या ठिकाणी बारामाही येतात. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता सीसीटीव्हीचे (Cctv in Alibag city) जाळे बसविण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नाने लवकरच शहरात ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह माजी नगरसेवक अनिल चोपडा, नगरपरिषद कर्मचारी वर्गाने शहरातील सीसीटीव्ही बसविण्याच्या ठिकाणांची पाहणी केली.

अलिबाग नगरी पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाची ठरत आहे. समुद्र किनारा, कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी पर्यटकांना कायमच भुरळ घालत आली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दर आठवड्याला दहा हजार पेक्षा अधिक पर्यटक अलिबागमध्ये येतात. शहरामध्ये वेगवेगळया विभागाचे जिल्हा, तालुका कार्यालये आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. याठिकाणी हजारोंच्या संख्येने कर्मचारी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.

First Published on: October 31, 2023 9:35 PM
Exit mobile version