महाडच्या श्री वीरेश्वर देवस्थान तलावाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ; सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

महाडच्या श्री वीरेश्वर देवस्थान तलावाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ; सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प

महाड:  महाड आणि पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या शिवकालीन श्री वीरेश्वर देवस्थान तलावाचे अडीच कोटी रुपये खर्चाचे सौंदर्यकरण कामाचा शुभारंभ गुरुवारी मंदिराच्या प्रांगणामध्ये करण्यात आला. यानिमित्त देवस्थान पंचकमिटीच्या हस्ते विधिवत भूमिपून भाविकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी देवस्थानचे प्रभारी सरपंच दीपक वारंगे, माजी सरपंच दिलीप पार्टी, उपसरपंच रमेश नातेकर, विश्वस्त संजय पवार, गणेश वडके, अनंत शेठ यांच्यासह माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, सूर्यकांत शिलीमकर, बिपिन महामुनकर, सुनील कविसकर, सुरेश कळमकर, गजानन काप, अनिल सावंत, प्रसाद माळवदे आदींसह शहरातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
श्री वीरेश्वर महाराज हे महाड पोलादपूरचे आराध्य दैवत असून लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या या मंदिराचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना देवस्थानचे माजी सरपंच कैलासवासी दगडूशेठ पार्टे यांची होती.त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विकासाची कामे करण्यात आली त्यानंतर सरपंचपदी दिलीप शेठ पार्टे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री जातमाता मंदिर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून वीरेश्वर तलावाच्या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात येऊन तलावाच्या कामाला मंजुरी घेण्यात आली. या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन विद्यमान सरपंच दीपक शेठ वारंगे आणि सर्व विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आले .

अंदाजपत्रकीय रक्कम २,५०,६७,६००
श्री वीरेश्वर तलाव सुशोभीकरण प्रकल्प सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचा आहे. हा प्रकल्प राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत महानगरपालिका यांच्या सहकार्यातून तलावाचे सौंदर्यकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. तलावाच्या चारही बाजूने भिंती बांधणे, हरित पट्टा विकसित करणे, कुंपण घालणे, बालोद्यान, नौका विहार, कारंजी, स्वच्छतागृह इत्यादी कामांचा समावेश आहे. तलावाची गुणवत्ता टिकवणे, प्रदूषण रोखणे, अनावश्यक वनस्पती नष्ट करणे यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम २ कोटी ५० लाख ६७ हजार ६०० एवढी असून सदरचे काम मेसर्स क्वान्टीजी इन्फ्राटेक एलएलपी ही कंपनी आहे.

देवस्थान ट्रस्टने उचलला ३० टक्के खर्चाचा वाटा
या कामामध्ये श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टने ३० टक्के खर्चाचा वाटा उचलला असून त्याचे ७५ लाख २० हजार २८० रुपये राज्य शासनाकडे जमा करण्यात, तसेच राज्य शासनाचे सुशोभीकरणाच्या कामामध्ये ७० टक्के सहभाग असून १ कोटी ७५ लाख ४७ हजार ३२९ रुपये असणार आहे. श्री वीरेश्वर देवस्थान तलावाचे सौंदर्यकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून महाडकर नागरिकांकडून करण्यात येत होती ती लवकरच पूर्ण होत असल्याचे समाधान विद्यमान सरपंच दीपकशेठ वारंगे आणि सर्व विश्वस्तांनी व्यक्त केले.

First Published on: January 12, 2023 6:46 PM
Exit mobile version