पनवेल महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा

पनवेल महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा

पनवेल महापालिकेवर पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गुरूवारी हंडा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या भावना घाणेकर, नवी मुंबई निरिक्षक प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, नगरसेवक सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, माजी नगरसेविका शशिकला सिंह, शहराध्यक्षा विद्या चव्हाण, अमिता चौहान आदींसह मोठ्या प्रमाणात महिला आघाडी या आंदोलनात सहभागी झाली होती. गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात पाणी पुरवठा अनियिमतपणे होत नाही. त्यामुळे डोक्यावर हंडे घेवून महिलांनी मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या विरोधात निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या.

पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या दालनात शिष्टमंडळाची बैठक झाली. येत्या दोन दिवसात या संदर्भात पाणी पुरवठा विभाग, सिडको अधिकारी, एमजीपी आदींशी चर्चा करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यावर हा मोर्चा स्थगित करण्यात आला.

First Published on: March 24, 2022 9:33 PM
Exit mobile version