रायगडमधील २४० ग्रामपंचायतींची १८ डिसेंबरला निवडणूक

रायगडमधील २४० ग्रामपंचायतींची १८ डिसेंबरला निवडणूक

 

 

 

अलिबाग: राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. बुधवारपासून लगेचच आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने जाहीर केले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२२ जाहीर केला आहे. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दि.१८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दि.२३ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे.

तालुकावार ग्रामपंचायतीच्या निवडणुका
रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील ६, मुरुड तालुक्यातील ५, पेण तालुक्यातील २६, पनवेल तालुक्यातील १०, उरण तालुक्यातील १८, कर्जत तालुक्यातील ७, खालापूर तालुक्यातील १४, रोहेतालुक्यातील ५, सुधागड तालुक्यातील १४, माणगाव तालुक्यातील १९, तळा तालुक्यातील १, महाड तालुक्यातील ७३, पोलादपूर तालुक्यातील १६, म्हसळा तालुक्यातील १३, श्रीवर्धन तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका येत्या १८ डिसेंबर रोजी होणार असून त्याचा निकाल दि.२० डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत: २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत.
नामनिर्देशनपत्राची छाननी दि.५ डिसेंबर. सकाळी ११ वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत असे ; त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप
मतदान दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत.
मतमोजणी आणि निकाल दि.२० डिसेंबर २०२२.

First Published on: November 10, 2022 9:09 PM
Exit mobile version